समितीबद्दल थोडक्यात

मी मराठी एकीकरण समितीच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

मी मराठी एकीकरण समिती ची काही ठळक ध्येय धोरणं आम्ही खाली अधोरेखित करत आहोत, प्रत्येक मराठी माणसाने अभ्यासपूर्वक ह्याचे वाचन करावे आणि मराठी भाषेच्या या चळवळीत स्वतःला सामील करून घ्यावे.

शिक्षणसंस्था

महाराष्ट्रातील शिक्षणाचे माध्यम सर्व स्तरांवर मराठी भाषेत करणे.

नोकरीमध्ये प्राधान्य

वंशाने मराठी मुलांनाच नोकरी मिळवून देणे.

मराठी भाषा सक्ती

सर्व कारभार १००% मराठी भाषेत करणे

मराठी व्यापार चालना

फेरीवाला विभागात फक्त वंशाने मराठी माणसालाच धंदा करण्यास देणे

अधिक माहिती

संघटनेबद्दल थोडक्यात

मी मराठी एकीकरण समितीच्या कामाला सन २०१५ ला सुरुवात झाली. त्या गोष्टीला दोन वर्षे झाली. २०१६ पर्यंत संघटना मराठी एकीकरण समिती या नावाने कार्यरत होती. पण काही तांत्रिक कारणामुळे नावाच्या अगोदर मी शब्द लावून संघटना मी मराठी एकीकरण समिती म्हणून काम करु लागली. या दरम्यान मुंबई विद्यापीठातील मराठी पत्रकारिता वर्गांच्या स्थलांतरा विरोधात संबंधितांची भेट घेऊन विरोध केला, दहिसरला जैनांकडून झालेल्या मराठी कुटुंबाला धक्काबुक्की विरोधात कुटुंबाची भेट घेतली, रिक्शा चालकांना मराठी येणे आवश्यक या दिवाकर रावतेंच्या निर्णयाचे भेटून अभिनंदन केले, सन २०१५ मध्ये छटपूजे विरोधात जुहू चौपाटी गाठली, मकर संक्रांती निमित्त दादर स्थानक व शिवाजी पार्कला तिळगुळ वाटप केले, दादर येथे माघी गणेशोत्सव साजरा केला. २०१६ मध्ये भायखळा येथील गुढीपाडवा शोभायात्रेत सहभागी, बोरीवली येथे शिवजयंती साजरी केली, दिवाळीला शहापूर येथील आदिवासी पाड्यांवर घराघरात व गोरेगाव मुंबई येथील रस्त्यावरील शाळेतील गरीब मुलांना फराळ व वह्यां पेनांच्या वाटपाचा उपक्रम राबविला, २०१७ मध्ये गुढीपाडवा सण, चिंचपोकळी येथे मिठाईचे वाटप केले. त्याबरोबर गुलाबाच्या फुलासह मराठी भाषेतूनच संवाद करा सांगणारे पत्रकही वाटले. मी मराठी एकीकरण समिती मराठी भाषा व मराठी संस्कृती जतन व संवर्धन करण्याचे काम करणार आहे. यासाठी मराठी माणसाचा लढा उभारीत आहोत.

शेवटच्या स्तरावरील वंशाने मराठी असलेल्या माणसाला रोजीरोटी ( एमआयडीसी, कंत्राटदार, विकासक इत्यादी कामांसाठी लागणारे कामगार व सुरक्षा रक्षक ) मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कायदे संमत करणे.

भविष्यात वैद्यकीय अधिकारी, अभियंते, वैज्ञानिक,शास्त्रज्ञ इत्यादी मराठी माध्यामातून तयार करणे. त्यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य, संस्था निर्माण करण्यासाठी ( मराठी भाषेत पुस्तकांची निर्मिती करणे) सरकारकडे पाठपुरावा करणे. त्यासाठी लागणारी उच्च शिक्षणातील मान्यताप्राप्त इतर भाषेतील पुस्तके सरकारशी चर्चा करून मराठी भाषेत भाषांतरीत करण्यासाठी भाषा संचनालयाला भाग पाडणे,

महाराष्ट्रतून वंशाने मराठी माणसांची आएएस/ आयपीएस फळी तयार करण्यासाठी संस्था निर्माण करणे. तसेच शालेय अभ्यासक्रमात पूर्व तयारीचे धडे समाविष्ट करुन घेण्यासाठी सरकारच्या संबधित खात्याकडे पाठपुरावा करणे.

शेतकर्‍यांना स्वतःच्या पायावर शेती व्यतिरिक्त लघुद्योगांचे ज्ञान मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे.

कार्यालय माहिती

कार्यालय पत्ता

श्री. प्रमोद दत्ताराम मसुरकर
बी /१/३०६, एक्सर लक्ष्मीनारायण गृहनिर्माण संकुल, एक्सर मार्ग,बोरिवली पश्चिम, मुंबई ४००१०३

इमेल आयडी

info@mimarathiekikaran.com

भ्रमणध्वनी

९८६९४१६३१३/९७७३९३४३३०